Sunday, May 29, 2011

हजारो ख्वाईशें ऐसी

हजारो ख्वाईशें ऐसी


जो साकार हो न पाई

फिर भी मेरा मन है प्यासा

उसी लव मै जलने की एक आशा



मैने दुंढा है सुकुन

हर दर्द के पंखडियो मे

तेरे यादों के जरा जरा पे

मकबुल है मेरा आशियाना



मैने कहा है मेरे मुकद्दर को

बावजुद तेरे हजार कोशिशो के

हरा रहेगा मेरी ख्वाबों का

एक जलवा मेरा आशियाना



तुझे सौगात है हर दर्द की

जो सितम उठाये है मैने उल्फत मे

मेरी तो है गुफ्तगु उनकी रुह से

फिर फासलो कि क्या अहमिहयत



मैने डाली है कश्ती पानी मे

समंदर भी है बेहोश सुनामी से

कश्ती के हजार टुकडो पे

मैने लिखा है नाम तुम्हारा



मै क्युं सुनाऊ यह दास्ता

बार बार तुझे मगर

तु तो है ना मुराद पत्थर

तेरा रुह से क्या वास्ता



मै पहुंचा हुं उस मुकाम पे

खुदा भी कुछ बिघाड न पाये

अरे मै तो रुह का सौदागर

तु तो सिर्फ दर्द का बेपारी



ओ खुदा अब तो रहम कर

सिख ले दानत इसी आदमी से

दर्द के बेपार को छोडकर

तु भी लहरा दे परचम रुह का



मेरे विस्मिल...

अब भी है एक ख्वाईश बाकी

हम दोनो के रुह की मजार पर

तु भी चढा दे तेरी ओर से एक चादर

ऒर ढांल एक तो आंसु

परवरदिगार तेरी आंखो से मगर



सुधाकर

हे मला उमगत नाही

आकाशी विहरे बगळा


आपल्याच मस्त धुंदित

जमिनीवरील बेडुक त्यास

पाण्यात मग का पाही.....



हे मला उमगत्त नाही....



भरधाव वेगाने धावे

तो अश्व पार चौखुराने

त्याचाच मित्र म्हणवणारा

कर्दमात का पाही असुयेने...



हे मला उमगत्त नाही....



तो राजहंस डोलत

मोती वेचित जाई

शेजारी बदक मात्र

मेलेल्या मासळी का खाई...



हे मला उमगत्त नाही....



मग लेक येता तारुण्यात

माय तीची पाठराखण करते

अन लेकिच्या माघारी ती

आरशांसी का सलगी करते.......



हे मला उमगत्त नाही....



मुलास मिसरुड फुटता

बापास होतसे अभिमान

अन त्याची मैत्रिण देता साद

हा का कावराबावरा परेशान.....



हे मला उमगत्त नाही....





सुधाकर

अरे पावसा ...

अरे पावसा ... का बरे तु असा येतो




तु ऎन दुपारी

असा का अंधार करतो

तु प्रत्येक वेळी येण्याची

मनाला चाहुल का देता

तु कोसळण्याआधी

आसमंत का गोंजारतो

पक्षांच्या पंखामध्ये

हवेचे शिड का भरतो

तु मल्हार राग गाण्याआधी

असा जोगिया का गातो



अरे पावसा ... का बरे तु असा येतो



मंदीरातील ते मंत्रोच्चार

मग का असे सादळती

मंदीरातील सा-या घंटा

तुझे ढोल का बडविती

मंदीराच्या त्या मंडपावर

तु असा का आवाज करतो

शंकरापुढील बिल्व प्रसादावर

का रे मग मुंगळ्यांची दाटी

मग त्या घामट शेजारतीला

तु आर्द्र आरती का होतो...

आसमंतास ओले करतांना

ईश्वरास का कोरडा ठेवतो..

अरे पावसा ... का बरे तु असा येतो



तु धरितीस मग

हिरवा शालु देतो

अरे को-या शालुवर

पुन्हा का असा वेडा होतो

प्रेमाची ही वेडी रीत

ती का बरे उधळते प्रित

त्या प्रितीचा मग सुगंध

रानावनात भिरभिरतो

मातीच्या मग कणाकणात

निर्मितीचा गंध ते जाळतो..



अरे पावसा ... का बरे तु असा येतो



शेतात मग चाले

शेतकामाची गडबड घाई

बिचा-या शेतक-याला

तु का बरे उसंत देत नाही

तु आषाढात रप रप पडतो

अन श्रावणात वाकुल्या दावी

भाद्रपदात मात्र तु

ठिय्या धरुन राही

बिचा-या शेतक-याने

किती सोसाव्या तुझ्या लहरी

परि तो शांत मनाने

तुझेच आभार मनी मानी

उभ्या पिकाकडे बघुन

तो देई त्रुप्तीचा ढेकर

उद्याच्या वेडया स्वप्नांचे

तो आजच इमले बांधी

तु कुणा देई भरघोस

कुठे उन्हाळा भरी

दुष्काळाच्या आगीत बिचारा

शेतकरी पिसून येई

कुठे अतिव्रुष्टीने

तु डोळ्यात पाणी आणतो

पुराच्या पाण्याबरोबर

तु आमचे संसार नेतो



अरे पावसा ... का बरे तु असा येतो



सुधाकर

किनारा ...

गर्दीत असूनही


मी राही एकटा

माझ्याच आस्तित्वाच्या शोधात

मी असे फाटका



निरंतन वेदनेच्या शापात

मी मजशी जाळी

तरी स्वप्नांच्या उतरंडीतुन

मी वाट काढी



अंतिचा काळोख माहित असतांना

स्वप्नांची चांदरात मी का आठवी

आठवणींच्या हया हिंदोळ्यातच

मऊ स्पर्शाची वेल का साठवी



स्पर्शाची हुरहुर का वाटे

क्षणिक सुखासाठी

आठवणींचा तो सुगंध मग

मनावर का मेघ दाटी



मग नितळ सलील भावनांचे

मनात सरोवर दाटे

अन अशाच किना‌-यावरती

तुझ्या भेटीचे स्वप्न पहाटे



्सुधाकर

पाण्यावरचे पक्षी ( एक स्वरचित्र )

अलगद उतरती .... ते पाण्यावर


चालत जाती ..... ते पाण्यावर



पाण्यातच चोंच खुपसुनी ... उदर भरती ते पाण्यावर ‌‌॥



पाण्यातच पाहुनी .... आकाशाची नक्षी

पाण्यावरच ते काढी .... पाण्याचीच नक्षी



उडुन पाण्यावर एका माळेने

अंबरात ती विहरत जाती

पुन्हा मोत्याचा सडा पाडत

ओळीनी ती अलगद उतरती....





त्या पाण्यावर ...त्या पाण्यावर



सुधाकर

माझ्या मुला.... तु IPL बघ

ग्रुहपाठाला


दे तु चाट

जाग्रण कर

शाळेला तु

मार बुट्टी

परिक्शेची तु

सोड चिंता

खाण्याची तुला

कसली फिकीर

म्यागी, पास्ता

पोटात भर

टिचरचा तु

सोड नाद

माझे ऎक....

शाळा सोड

पाटी फोड

पुस्तके तु

रद्दीत विक ....



माझ्या मुला .... तु IPL बघ.... तु IPL बघ



टाईम टेबल तु

लक्शात ठेव

पिचवर

दे लक्श

सचिनला काही

समजत नाही

खेळाडु

तुच निवड

ब्याटींग तु

आधी घे

रनरेट कडे

दे लक्श

मार फोर

मार सिक्स

रन तु

चोरित रहा

उभा कर

मोठा स्कोर

खेळाडुंचा बायोडाटा

नको विसरु

बोलिंग कडे

दे लक्श

आखुड टप्पा

टाकु नको

यार्करचा

मारा कर

क्याचेस तु

टिपित रहा

फिल्डींगनेच

म्याच विन होते

रन तु

देऊ नकोस

वाटल्यास

बालर बदल

गिलख्रिस्ट

सायमंडची

फिकिर नको

पोलार्डला

तु पुढे आण

मार six

टाळ्या तु

वाजवित रहा ...

तु सतत

TV बघ



माझ्या मुला .... तु IPL बघ.... तु IPL बघ



प्रिटी झिंटा

दिसते क्युट

दिपिका ही

हलवते हाथ

शिल्पा-राजचा

नाद सोड

शमितावर तु

लक्श केंद्रित कर

शाहरुख, सॊरभला

दे धक्का

चिअर लिडरस

बरोबर नाच

चुकवु नको

एकही ठोका ....



माझ्या मुला .... तु IPL बघ.... तु IPL बघ



दुखतात का

तुझी बोटे

सोड मग तु

उंगली क्रिकेट

सेहवागच्या

आईचे ऎक

तु फक्त

TV बघ

टिव्ही वरच्या

जाहिराती बघ

मुंगुस बटेचा

हट्ट सोड

पुढच्या वाढदिवसाला

घेऊन देईन

मचफिक्सींगकडे

नको लक्श

स्पाट फिस्कींगवर

तु भर दे

पॆज मार

सर्वांशी

कमवु दे

त्यांना पॆसा

ललित मोदीला

हिरो कर

देशाला नाही

काही काम

उत्पन्न बुडव

ऎश कर

देशाबरोबर तु

TV बघ

तु सोड

करिअर वा-यावर

नॊकरीला

मार लाथ

धंद्याचे

दिवाळे काढ

तु फक्त एकच कर ....



माझ्या लाडक्या ...तु फक्त IPL बघ.... तु फक्त IPL बघ



सुधाकर